महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती ,विमुक्त जाती ,भटक्या जमाती  व इतर मागासप्रवर्ग संवर्गातील जातीची यादी दि.25.06.2008 रोजी अद्ययावत करण्यात आली आहे .यासाठी राज्य शासनाच्या तत्कालिन राज्यपालांच्या सहीनिशी शासन निर्णय दि.26.09.2008 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .

यामुळे जात प्रमाणपत्र व त्याची पडताळणी करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी सदर यादीचा उपयोग होईल .याअगोदर जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकऱ्यांना प्रमाणपत्र सादर करताना अडचणी निर्माण होत होत्या .तसेच अनेक श्रुटींचे निराकरण या निर्णयमुळे झाले आहे .सदरच्या निर्णयामध्ये ,संवर्गनिहाय जातींचा उल्लेख शिवाय पोटजातींचा देखिल उल्लेख करण्यात आला आहे.संवर्गनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रसंवर्गआरक्षण
01.अनुसुचित जाती ( SC )13 %
02.अुनसुचित जमाती ( ST )7 %
03.इतर मागास प्रवर्ग ( OBC )19 %
04.विमुक्त जाती – अ ( VJ-A )3 %
05.भटक्या जाती ब ( N.T.-B )2.5%
06.विशेष मागास प्रवर्ग ( SBC )2 %
07.भटक्या जाती -क (N.T -C)3.5 %
08.भटक्या जाती -ड ( N.T. -D )2 %
09.आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग ( EWS)10%

संवर्गनिहाय जातीची यादी व आरक्षण पाहण्यासाठी राज्य शासनाचे दि.26.09.2008 रोजी खालील शासन निर्णय डाऊनलोड करा .